पिंपरी I झुंज न्यूज : थेरगाव येथील “द रायझिंग स्टार्स” प्रोडक्शन हाऊस निर्मित “अनामिका” हा दृकश्राव्य स्वरूपातील पाच कवितांचा काव्य संग्रह नुकताच प्रकाशित करण्यात आला असून हा काव्य संग्रह द राझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन या युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. या कविता संग्रहाचे लेखन कवी रहेमान पठाण यांनी केलेले आहे तर विनय सोनवणे यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रण तरुणांच्या मनाला भुरळ घालणार आहे.
कविता संग्रह प्रकाशन वेळी, आजच्या डिजिटल युगात द्रुक श्राव्य माध्यमातून कविता प्रकाशित होणं हे काळाची गरज आहे. पूर्वी कविता संग्रहाचा फक्त वाचक असायचा किंवा संमेलनातून श्रोते असायचे पण डिजिटल क्रांती झाल्यामुळे कवितांचा प्रेक्षक वर्ग तयार झाला असून त्यांना एकाच वेळी कवितांचा ऑडिओ व्हिज्युअल अनुभव घेता येणार आहे. असे मत निर्माते विनय सोनवणे यांनी व्यक्त केलं.
या कविता संग्रहात कवितांच्या प्रत्येक रचनेवर कलाकारांनी अभिनय करून शब्दांच्या भावना स्क्रीनवर प्रकट केल्या आहेत. पाचही कविता या प्रेम आणि विरह या विषयाला धरून आहेत. लेखन कवी रहेमान पठाण यांनी केलं आहे. संपूर्ण कवितांचे ध्वनिमुद्रण विनय सोनवणे यांच्या आवाजात आहेत. संपूर्ण एकसंघ काव्यसंग्रह पाहण्यासाठी द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन या युट्युब चॅनेलवर भेट देण्याचे आवाहन कवी रहेमान पठाण यांनी केले आहे.
सहभागी कलाकार पुढीलप्रमाणे
लेखन / कवी : रहेमान पठाण
निवेदक / व्हाईस डबिंग : विनय सोनवणे
१ ) ती
कलाकार : संभाजी बारबोले , मोहिनी कांबळे
डबिंग : संभाजी , मोहिनी , रहेमान
२ ) स्कार्प
कलाकार : यशराज , शितल
निवेदक / व्हाईस डबिंग : विनय सोनवणे
३ ) ओढ
कलाकार : आरती , नितीन & संभाजी
निवेदक / व्हाईस डबिंग : विनय सोनवणे
४ ) अनामिका
कॅमेरा : रहेमान पठाण , अमर चाकोटकर
कलाकार : राहुल जाधव , सिद्धी झेंडे
निवेदक / व्हाईस डबिंग : विनय सोनवणे
५ ) घुमा
कलाकार : रहेमान पठाण
कॅमेरा : अमर चाकोटकर
निवेदक / व्हाईस डबिंग : विनय सोनवणे
विशेष आभार
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, पुणे
प्राचार्य डॉ. अभय खंडागळे
डॉ. अपर्णा पांडे
ज्ञानेश्वर भंडारे
विद्यावणी सामुदायिक रेडिओ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
अतुल झंझाड
Email : therisingstarsau@gmail.com
संपर्क : 8263083319 / 9765511793
The Rising Stars Film Production