पुणे I झुंज न्यूज : करोनाकाळात सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. तर अनेकांवर हालाखीची परिस्थिती ओढवली. मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. पण आलेल्या परिस्थितीवर मात करून, समाजाला धीर देण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ,काही मंडळी सरसावली आहेत. अवगत असलेली कला आणि उपलब्ध साधनांचा वापर करुन, समाज प्रबोधन करत आहेत . त्यापैकी अभिनेते, दिग्दर्शक राम माळी यांचे कार्य महत्त्वाचे ठरते.
राम माळी यांनी अनेक मालिका व चित्रपटात भूमिका केल्या आहेत. दिग्दर्शनासाठी योगदान दिले आहे. ते सध्या मुंबईला स्थायिक आहेत. ते मूळचे सांगलीचे असले तरी त्यांचे पिंपरी-चिंचवडशी जवळिकीचे नाते आहे. सध्याचा करोणाचा काळ, ऑक्सिजन अभावी होणारे लोकांचे हाल, ऑक्सिजनचे महत्त्व ,जीव वाचवणारा ऑक्सिजन कृत्रिमरीत्या तयार केला जातोय. त्याची गरज आणि मागणी वाढली आहे. पण त्याच्या लाखोपटीने निसर्गात तयार होणाऱ्या अक्सिजनविषयी विचार करण्याची ही वेळ आहे.
त्यासाठी वाढती लोकसंख्या, जागेची कमतरता, झाडांची कत्तल आणि त्यामुळे नैसर्गिक ऑक्सिजनची होणारी हानी. या सर्व संदर्भांचा समावेश असणारी, एक मुक्त छंदातील कविता राम माळी यांच्या हातून साकारली. त्याला त्यांनी मूर्तरूप देण्यासाठी, समर्पक दृश्ये, उत्तम संकलन आणि कल्पक सादरीकरणाद्वारे, एका छोट्याशा ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून, राम माळी यांनी या विषयाची छान मांडणी केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, राम माळी यांच्या कलात्मक प्रबोधनाचे कौतुक करण्यात येत आहे.
अभिनेता कमलेश सावंत, अभिनेता संजय खापरे, अभिनेता उमेश बोळके, कवी लेखक अनिल राऊत, दिग्दर्शक किशोर साव, दिग्दर्शक बाळासाहेब गोरे, पत्रकार लेखक श्रीकांत चौगुले, पत्रकार सुनील लांडगे, पत्रकार महेश तेटांबे, उपसंपादक राजेंद्र घरत, झुंज न्यूज चे संपादक अनिल वडघुले, रुपेश कदम आदि मान्यवरांनी सदर व्हिडिओ बद्द्ल उल्लेखनीय शब्दात वर्णन केले आहे.