पुणे I झुंज न्यूज : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेल्या संगीत स्वयंवर या गाजलेल्या संगीत नाट्यकृतीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत नाटकाचे सादरीकरण बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने करण्यात आले.
काकासाहेब खाडिलकर यांनी रचना असलेल्या या संगीत नाटकाला भास्करबुवा बखले संगीत मिळाले होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे यांच्या संकल्पनेतून या संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.या संगीत नाटकाच्या नियोजनात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,सहसचिव डॉ.निवेदिता एकबोटे, सचिव शामकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या संगीत नाटकासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सभागृह खचाखच भरले होते.
या नाटकात २५हून अधिक गीते होती. संगीत स्वयंवर या नाटकाचे मुख्य कथानक हे देवी रुक्मिणी व श्री कृष्णाच्या लग्नावर(स्वयंवर) आधारित आहे. यामध्ये श्री कृष्णाला कधीही न पहिलेली रुक्मिणी श्री कृष्णाच्या केवळ केलेल्या रूपाच्या वर्णनावर श्री कृष्णाच्या प्रेमात अखंड बुडून जाते. आणि श्रीकृष्णाबरोबरच लग्न करण्याचा निश्चिय करते. यावर आधारित कथेवर संपूर्ण नाटकात कलाकारांनी खूप अप्रतिम सादरीकरण केले.