पुणे I झुंज न्यूज : मान्यताप्राप्त पीएमटी कामगार संघ इंटक चे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ महाले हे नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त मान्यता प्राप्त पी.एम.टी कामगार संघ इंटक च्या वतीने सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पी.एम.टी कामगार संघ इंटक च्या वतीने हरी महाले यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. व पुढील भावी आयुष्य सुख समृद्धीचे व आरोग्यदायी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नूरुद्दीन इनामदार (महासचिव), सागर कांबळे (उपाध्यक्ष: पुणे शहर व जिल्हा इंटक), ए.एन.अनपुर, जावेद खान, राजाभाऊ जगताप, जुम्मा शेख, महेश पारगे, मोहम्मद पठाण, नवनाथ माळी, राजेंद्र जगताप, कुमार घाडगे, मोहम्मद खान, हरी ओम, रवींद्र ढवळे, दत्ताभाऊ बोरकर, अजय चव्हाण, प्रदिप कदम, राकेश घोणे, राहुल जोगदंड, विजय दाभोळकर, अजय नाईक, अमित धाराशिवकर, किशोर पांचाळ , तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
“मला सेवानिवृत्त झाल्याबद्दल आपण सर्वांनी सोशल डिस्टन्स राखत व कामगारांचे मन न दु:खता असा हा सुखद सोहळा साजरा केला. त्याबद्दल मी पीएमटी कामगार संघ इटंकचा मनपूर्वक आभारी आहे. कारण पीएमपीएमएल प्रशासनाने कोव्हीड १९ ला रोगराई घाबरून सेवा निवृत्तीचा सत्कार सोहळा रद्द केला पण माझ्या पीएमटी कामगार संघ इटंक ने मात्र छोटासा असा हृदय सत्कार आयोजित केला. त्याबद्दल मी पीएमटी कामगार संघ इटंक चा आभारी आहे. असे हरी महाले यांनी भावनिक मत व्यक्त केले.