पुणे | झुंज न्यूज : “अवघ्या ३० मिनिटात ऑक्सिजन सिलेंडर संपेल…साहेब मदत मिळेल का” अशी फोन वरुन एकाने विचारणा केली. क्षणांचा विलंब न करता त्या पोलिस अधिकाऱ्यांनी धावाधाव सुरु केली. हा ऑक्सिजन सिलेंडर वेळेच्या आधी पोहचवून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवले. पोलीस म्हणून कर्तव्याबरोबरच माणुसकीचा धर्म ही त्यांनी जोपासला.
दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावत आहे. अशा वेळी एखाद्या रुग्णाला वेळेत ऑक्सिजन मिळाला तर त्याचे प्राण वाचतील यासाठी नातेवाईकांना कडून धडपड सुरू असते. वडगावशेरी येथे राहणारे देहूरोड पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (ता .२४ ) सकाळी साडेदहा वाजता त्याच भागात राहणार्या स्थानिक व्यक्तींचा त्यांना फोन आला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे युनिकेअर हॉस्पिटल एकूण तीस बेड असून पाच व्हेंटिलेटर तर दहा ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. कोरोना रुग्णांना अर्धा तास पुरेल एवढे सिलेंडरमध्ये ऑक्सिजन शिल्लक आहे. तुमच्या कडून ऑक्सिजन सिलेंडरची मदत मिळेल का?” वरीष्ठ पोलीस निरीक्षक सोंडे यांनी तातडीने प्रयत्न सुरु केले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलचे (Ceo) मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांच्याशी संपर्क साधून त्यांनी दोन ऑक्सिजन सिलेंडर मिळावले. त्यानंतर ज्योतीबानगर – तळवडे एम.आय.डी सी. येथील एका वर्कशॉप मधून त्यांना चार ऑक्सिजन सिलेंडर मिळावले.
एकूण सहा ऑक्सिजन सिलेंडर वेळेत पोहचवून कोरोना रुग्णांना त्यांनी दान मिळवून दिले. वडगावशेरी खराडी भागातून ‘फोनद्वारे व व्हाट्सॲप’द्वारेत् कौतुकास्पद कामगिरी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षांव होत आहे.