पंढरपूर I झुंज न्यूज : पंढरपूर तालुक्यातील पेहे गावचे युवा नेते व विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कर्मचारी सुनिल मोकळे मालक यांचा वाढदिवस विठ्ठलराव शिंदे कारखान्यांमध्ये एकदम साध्यापनाने साजरा करण्यात आला. सुनिल मोकळे मालक हे माढा तालुक्याचे विकासरत्न लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत.
सुनिल मोकळे मालक हे विठ्ठलराव शिंदे कारखान्यात दोन चार वर्षांपासून कामावर आहेत. त्यांची मनापासूनची एकच इच्छा होती कि आपला वाढदिवस आपण जेथे काम करतो तेथे साध्या पद्धतीने का होईना साजरा करावा. एके दिवशी उपळवटे गावाचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांची सुनिल मोकळे मालक यांनी भेट घेतली आणी मनातील हि कल्पना सांगितली होती. त्यामुळे सुनिल मोकळे मालकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपळवटे गावाचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांचे योगदान मोलाचे आहे.
यावेळी वाघोली गावचे युवा नेते समाधान मिसाळ, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे इंजिनिअर सुहास वाघमारे, महादेव हंबीरराव जाधवm परशुराम पालवे मामा, विश्वजीत लांडगे, राजकुमार मदणे, शुभम शिंदे, अभिषेक गाडे, मारुती ठावरे, शिवाजी सरकाळे, अरविंद कदम, उपळवटे गावाचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे उपस्थित होती
“खरोखरचं “जिथे काम तेथे वाढदिवस” हि कल्पना खुपचं चांगली होती. आत्ता कुठे कोरोना महामारी आजारापासून आपण सावरतोय तो पर्यंत कोरोना रोगाने परत एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे माझ्या सर्व कामगार मित्रांनी कोरोना महामारी आजारापासून वाचण्यासाठी मास्क जरुर वापरावे हात वारंवार स्वच्छ धुणे सोशल डिस्टनस ठेवणे या नियमांचे पालन करावे असा संदेश वाढदिवसाच्या माध्यमातून कामगारांना सुनिल मोकळे मालक यांनी दिला.