(प्रतिनिधि : मनोज सोनवणे)
पिंपळे गुरव | झुंज न्यूज : सांगवी येथील सर्वस्पर्शी फाउंडेशनच्यावतीने संस्था स्नेहमेळावा व कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन तसेच कोरोना संसर्ग काळात काम केलेल्या कोरोना योद्धा यांचा सत्कार नुकताच करण्यात आला .
सर्वस्पर्शी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक स्वयंसेवी संस्था निवृत्त शिक्षक तसेच प्राध्यापक व समाजातील सर्व स्तरातील एक गोरगरीब व गरजूंच्या मदतीला व त्यांच्यासाठी कार्य करणारी संस्था असून , संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सभा व स्नेहमेळावा आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ . राजू पोखर्णीकर , चंदन जोगे , सुजाता गुरव , योगाचार्य रानडे अशोक नडे , डॉ.स्वाती बडीये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बागवान कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख डॉ. समिंदर घोक्षे या अतिथींच्या हस्ते पर्यावरण संदेश म्हणून डॉ वृक्षरोपणास पाणी देऊन संस्था अध्यक्ष योद्धा डॉ . पोखरणीकर यांनी प्रस्तावना सादर केली. संस्थेचे कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन योगाचार्य अशोक नडे यांचे हस्ते करण्यात आले.
पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे
या वेळी संस्थेचे पालघर येथील जिल्हा युनिटचे अध्यक्ष राजू जैन , उपाध्यक्ष गणेश देव , गरीब मुलांसाठी स्ट्रीट स्कूलचे प्रणेते अभिजित पोखरणीकर , मिलिंद पंडित, आशुतोष रानडे, डॉ .स्वाती बडीये , पत्रकार संदीप सोनार, परवीन शेख, ययाती लांडगे, राजश्री पोटे, डी.ए .बागवान, राजू जैन, गणेश देव, डॉ. समिंदर घोक्षे, सागर पोखरणीकर, कोमल सेरंगी, डॉ.चंदन जोगे आदी मान्यवरांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. महादेव रोकडे, जनसंपर्क अधिकारी मेजर अनिल मोहोळ, एफ.डी .देवरे, सागर पोखरणीकर, गुरविंदर पोखरणीकर, कोमल सेरंगी यांनी परिश्रम घेतले. डॉ. माधव रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. समिंदर घोक्षे यांनी आभार मानले.