(प्रतिनिधि : शशिकांत जाधव)
तळवडे | झुंज न्यूज : रुपीनगर येथे स्वयंभु युवा मंचाच्यावतीने शासकीय नियमांचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. मिरवणूक किंवा वाद्यकाम यांना फाटा देवून मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करुन आणि शिववंदना घेऊन जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक पंकज भालेकर, पौर्णिमाताई सोनवणे, स्थायी समिती सदस्य प्रविण भालेकर, रविंद्र सोनवणे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, शरद भालेकर, लतीफ सय्यद, नामदेव नरळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन किरण गाढवे, किशोर नढे, अमोल महिंद, अक्षय गोंजारी, आसाराम ढाकणे, राहुल सरोदे, नागेश गावड यांनी केले तर सूत्रसंचालन गौतम दळवी यांनी केले.