दौंड I झुंज न्यूज : वडगाव बांडे येथील शेलार कुटुंबाने आपल्या आईच्या आठवणी कायम राहाव्यात, यासाठी आईच्या स्मरणार्थ दशक्रिया घाटावर वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे. आपण सर्वांनी प्रयत्नशील राहून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन देखील या कुटुंबाने केले आहे.
वारकरी सांप्रदयाचे पाईक असणारे शेलार परिवारातील मातोश्री अंजनाबाई शेलार यांचे नुकतेच निधन झाले त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांची मुले रामदास, शामराव, बाळकृष्ण, मछिंद्र आणि मुलगी कमल जाधव यांनी आईची कायम आठवण राहावी. ज्या ज्या वेळी गंगे किनारी जाऊ त्यावेळी वृक्ष दिसला कि आईची आठवण येत राहील या उद्देशाने दशक्रियेच्या दिवशी पंचक्रोशीतील मान्यवरांच्या हस्ते दशक्रिया घाटावर वृक्षारोपण केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे मा. नगरसेवक कैलास थोपटे, शांताराम भालेकर, नगरसेवक माऊली थोरात, मा. सैनिक शंकरबापू लांडगे, योगिनाथ बाबा पालखी सोहळ्याचे प्रमुख सुनील तात्या वडघुले, मा. सरपंच रामभाऊ शिवले, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आणि वडगाव बांडे ग्रामस्थांसहित पंचक्रोशीतील आप्तेष्ट उपस्थित होते.
“या वृक्षारोपणप्रसंगी बाळकृष्ण शेलार म्हणाले कि, आमची आई धार्मिकतेने आपले जीवन जगली. तसेच शेतांमध्ये काबाडकष्ट करण्यात तिचे आयुष्य गेले. आमची आई आता यापुढे आम्हाला दिसणार नाही, पण हि झाडे तिच्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर जिवंत ठेवत एक प्रेरणा देत राहतील.”