पिंपळे गुरव I झुंज न्यूज : पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार तसेच त्यांचे बंधू बालाजी पवार कुटुंबाने दातृत्वाची पुन्हा प्रचिती देत अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी, तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी’ संत – महंतांच्या उपस्थितीत निधी हस्तांतरित केला.
पिंपळे गुरव येथील कार्यालयाच्या प्रांगणात संत – महंतांच्या उपस्थितीत नयनरम्य समारंभात अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तुषार चौधरी यांच्याकडे, तर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजामगुंडे यांच्याकडे प्रत्येकी एकावन्न हजार रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी अरुण पवार, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज, ह.भ.प. आत्माराम महाराज शास्त्री, ह.भ.प. वाघ महाराज, वेदांतचार्य ह.भ.प. हरीभाऊ पालवे महाराज, ह.भ.प. शास्री महाराज, ह.भ.प. गजानन महाराज वाव्हळ, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष मारूती महाराज कोकाटे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजामगुंडे, भिष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण खडके, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण फिरके, ह.भ.प. नानासाहेब शितोळे महाराज, श्री गीता अध्यात्मिक आश्रम सत्संग मंडळ आळंदीचे वेदांतचार्य ह. भ. प.हरिभाऊ शास्त्री महाराज, देहूचे उपसरपंच संतोष हगवणे, सामाजिक कार्यकर्त्या आशा पवार, दिघीकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. उत्तम घुगे, दिव्यांग प्रतिष्ठानचे हरिश्चंद्र सरडे, उद्योजक चैतन्य पाटील, दत्तात्रय धोंडगे, कुमार लोमटे, ह.भ.प.राजुभाऊ मोरे, जेष्ठ नागरिक आणि मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हभप. शिवाजीराव महाराज मोरे यांनी अरुण पवार यांच्या पर्यावरणासंबंधित कार्याचा आढावा घेतला. तसेच भंडारा डोंगर आणि अन्य ठिकाणी लावलेल्या हजारो झाडांचे संगोपन केल्याचे सांगताना अरुण पवार हे खरे वृक्षमित्र आहेत, अशा शब्दात गौरव केला. तसेच पालखी मार्गावर झाडांची लागवड करण्यासाठी ‘हरीतवारी’चे महत्त्व अधोरेखित केले.
हभप. वाघ महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना अरुण पवार यांच्या दातृत्वाचे कौतुक करीत असा दानशूर सुपुत्र निर्माण होणे, हे आई – वडीलांची पुण्याई असते, असे गौरवोद्गार काढले. वेदांतचार्य हरीभाऊ शास्री महाराज यांनी ‘राममंदिर’ ही अनेक वर्षांची तपश्र्चर्या आहे. ती संपूर्ण भारतदेशाची अस्मिता आहे, असे सांगताना या मंदिरनिर्मितीचे काम आपण पाहू शकतो. हेच आपले भाग्य आहे, असे सांगितले. तसेच एवढी मोठी मदत करणारे फार कमी उद्योजक असतात. परंतु अरुण पवार हे उद्योजकातील दानशूर व्यक्ती आहेत, असे सांगितले.
वेदांतचार्य हभप. हरीभाऊ पालवे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजन आणि कृतीचे स्पष्टीकरण यांचे महत्त्व विशद करून अरुण पवार हेसुद्धा नियोजनबद्ध कृती करताना दिसतात. असे सांगितले. तर शिवव्याख्याते ह.भ.प. गजानन महाराज वाव्हळ यांनी गडकिल्ले ही महाराष्ट्राची खरी अस्मिता असून, गडकिल्ल्यांवर जाताच एक वेगळी ऊर्जा मिळते. यामुळे गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. अरुण पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले. ह.भ.प. शास्री महाराज यांनी अरुण पवार यांच्या दातृत्वाची दखल घेत अभिनंदन केले.
यावेळी दत्ताजी म्हेत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत कुरुलकर यांनी, तर प्रकाश इंगोले यांनी आभार मानले.