पुणे I झुंज न्यूज : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेतर्फे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार ‘कर्मयोगी ‘चे संपादक प्रकाश भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला.
रविवारी नगर येथे झालेल्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. भाऊसाहेब ढमाले यांची अध्यक्षपदी , दीपक कोल्हे यांची उपाध्यक्ष पदी , महेंद्र कातोरे यांची सचिव पदी तर धनसिंग गव्हाणे यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. आबासाहेब पवार यांची कोषाध्यक्ष पदी , नंदकुमार गाडे , रामदास मस्के , विक्रम दिवटे, विजय बेरड यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. मारुती ढोबे यांची जामखेड समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली .
यावेळी राजेंद्र बकरे , सुभाष सोनवणे , प्रकाश भिलारे , बाळासाहेब जाधव , सचिन निगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ढमाळे आदी उपस्थित होते . बदली धोरण ,पदोन्नती ,जुनी पेन्शन ,कृषी सेवकांची वेतन निश्चिती या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला .