पुणे I झुंज न्यूज : एम. सी. ई. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये ‘ पारितोषिक विजेत्या ऋतुजा प्रॉडकशनच्या शॉर्ट फिल्म ‘झळ’चे सादरीकरण” दिनांक २७ जानेवारी, २०२१ रोजी गुगल मिट या माध्यमाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
” या शॉर्ट फिल्म द्वारे मुलांना पाणी तुटवडा समस्येची जाण करून देण्यात आली व पाणी जपून वापरावे हा संदेश देण्यात आला. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी पुनीत बसन व ग्रंथपाल सौ. चंदा सुपेकर यांनी प्राचार्या डॉ. अनिता फ्रांन्झ यांच्या मार्गदर्शना खाली या सत्राचे आयोजन केले.