आळंदी I झुंज न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान आणि जनजागृती मोहीम यावर राज्यस्तरीय वकृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला महाराष्ट्रातून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान आणि जनजागृती मोहीमेला शांतीब्रम्ह मारुती महाराज कुर्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजक प्रमुख विठ्ठल शिंदे आणि वारकरी क्रांती सेना यांनी इंद्रायणी नदीचे महत्व आणि सध्याची परिस्थिती याविषयावर वकृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
ह भ प सोहम महाराज काकडे, ह भ प कुमारी ज्ञानेश्वरी महाराज भोजदरे, ह भ प भक्ती महाराज चव्हान, ह भ प विनय महाराज नेहेते, ह भ प विशाल महाराज देशमुख, ह भ प कोमल महाराज शेलार ह भ प कुमारी भक्ती महाराज बनकर यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले पा., गुरुवर्य भास्कर महाराज पवार, ह भ प रोहीणीताई महाराज राऊत संगमनेरकर, ह भ प पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, ह भ प विजय महाराज सावरकर, ह भ प शारदताई महाराज फोफसे , ह भ प पूनम ताई महाराज गिरी, ह भ प रामनाथ महाराज राऊत केेेेेेेळगांव मा.सरपच दिलीप मुंगसे, अॅड.नाजीम शेख, राजेश दिवटे, निलेश घुंडरे, तुषार नेटके, दिनेश कुऱ्हाडे, अनिल जोगदंड संदिप शिंंदे ,दिपक राठोड सुरज ठोंबरे रामभाऊ हाळदेे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब करंडे आणि आभार लक्ष्मण लटपटे यांनी केले.