वाकड I झुंज न्यूज : योध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणी साठी देशभरातून निधी संकलन चालू आहे. समाजातील प्रत्येक घटक या प्रभू श्रीराम मंदिरा साठी यथाशक्ती योगदान देत आहे. या पुण्य यज्ञात नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे यांनी कस्पटे वस्ती येथील जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पदाधिकारी यांच्या समवेत भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, वंदन करून राममंदिर उभारणी साठी ५१,००० रुपये चा धनादेश समर्पित केला.
नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे यांना या राममंदिर उभारणी योगदानात, पवित्र कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रकाश सहत्रबुद्धे, सोनटक्के, वसंत देशमुख, काळे, दिलीप देशमुख, गुप्ताजी, उमेकरजी, अजितसिंह, पाटील, किरण पानवलकर हे मान्यवर उपस्थित होते.