आळंदी I झुंज न्यूज : हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिघीतील ज्येष्ठ शिवसैनिक गणपतराव रामचंद्र वाळके यांचा वारकरी पोशाख देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी मनसे चे आळंदी शहराध्यक्ष निलेश बाप्पू घुंडरे पाटील, रस्ते आस्थापनाचे तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटे, शहराध्यक्ष तुषार (बाळू) नेटके उपस्थित होते.
“ पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार सदैव प्रत्येक शिवसैनिकात राहतील त्या माध्यमातून ते नेहमीच अजरामर राहतील. तुमच्याकडे जर आत्मबल, आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही. नोकरी मिळवण्यापेक्षा नोकरी देण्याऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. मराठी माणूस स्वतःच्या व्यवसायात मोठा होऊन त्याचा ठसा जगात उमटावा नेहमीच म्हणत. तुम्ही उद्या भविष्यात वयाने म्हातारे व्हाल परंतु विचाराने म्हातारे होऊ नका…!
आपल्या भाषणात असे अनेक प्रेरणादायी वाक्य बाळासाहेब ठाकरे हे सांगत असत त्यामुळे जीवनशैली कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असायचा या सर्व आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला .