अहमदनगर I झुंज न्यूज : पिंपळगाव टप्पा प्रल्हाद शिरसाट यांच्या संत वामनभाऊ एकता मंच पॅनल चे ९ चे ९ उमेदवार विजयी तर मेजर सतीश शिरसाट यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला ९/० अाशी लढत झाली. ग्रामपंचायत पिंपळगाव टप्पा निवडणूक विजयानंतर ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.
“ विजयी उमेदवार प्रभाग एक मधुन ज्ञानेश्वरी राजेंद्र शिरसाट, कमल रघुनाथ शिरसाट, राहीबाई आजिनाथ शिरसाट, प्रभाग दोन मधुन पांडुरंग गोरक्ष शिरसाट , संध्या भाऊसाहेब शिरसाट, सिमा सुदर्शन शिरसाट, प्रभाग तीन मधुन अविनाश संपत वाघमारे, नितीन शिवनाथ शिरसाट, प्रयागा पाडुरंग शिरसाट हे उमेदवार निवडुन आले आहेत .
यावेळी प्रल्हाद शिरसाट यांनी सांगितले हे सर्व उमेदवार सर्व सामान्य आहेत हे गावच्या विकासाठी प्रयत्न करतील तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत योजनाचा लाभ मिळवुन देतील फक्त आणी फक्त विकासाच राजकारण करतील यात शंका नाही यावेळी निवडुन आलेले उमेदवार पांडुरंग शिरसाट मेजर यानी सांगिले.
गावच्या विकासासाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील सर्व मुद्दे घेऊन काम करु. गावच्या विकासाचा अराखडा तयार करु दर महा ग्रामसभा घेऊ दर तीन महिन्याला जनता दरबार घेवु प्रसंगी गावातील बाहेर गावी आसलेले भुमिपुञ प्रमुख पाहुणे म्हणुन बोलवु गावातील शेवटच्या घटका पर्यत विकास कामे करु गाव तंटा मुक्त करु बांदा बांदचे वाद मिटवु आशा अनेक मुद्यावर त्यांनी मत व्यक्त केल.
गावातील सत्ता पालट करण्यामगे तरुण कार्यकर्ते ते जेष्ठा पर्यंत सर्वांनीच खुप मेहनत घेतली. गावातील तरुण वर्ग व महिला आणि गावाबाहेरील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचा उस्फुर्त पाठिंबा मिळाला. तर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.