शिरूर I झुंज न्यूज : टाकळी हाजी मळगंगा हॉटेलचे पाठीमागे वाळु व्यवसायाचे तसेच उसने पैशाचे कारणावरून स्वप्नील छगन रणसिंग (वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे) याचा विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे आणि आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे( दोघे रा.आमदाबाद ता. शिरुर जि.पुणे) व इतर यांनी संगनमत करून होंडा शाईन मोटार सायकलवर येवुन पिस्तुलमधून गोळया झाडुन खुन केला व त्याचे सोबत असलेला त्याचा मित्र स्वप्नील सुभाष गावडे याला गोळी मारून जखमी केले होते. याबाबत स्वप्नील रणसिंग याच्या पत्नीने शिरूर पोलीस स्टेशनला दिलेले फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२, ३०७ तसेच आर्म ॲक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
“ गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे आजूबाजूचे गावातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. आरोपीचा जाणेयेण्याचा मार्ग याबाबत स्थानिक गावकऱ्यांकडे सुद्धा चौकशी केली होती. त्यातूनच गुन्हे शाखेचे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन आरोपी विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या शेंडगे आणि आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे यांना शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौक येथे साध्या वेशात सापळा ताब्यात घेणयात आले.
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या दिवशी व वाळू माफिया यांचे वादातून हि घटना घडली होती. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तपासाबाबत शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हयाचा समांतर तपास करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमणे बाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे तपासासाठी शिरूर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती.
कोयत्या शेंडगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर पोलीस स्टेशनला मारामारी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे आणखीन कोणी साथीदार आहेत काय? याबाबतचा अधिक तपास आरोपींची मे.कोर्टाकडून पोलिस कस्टडी रिमांड घेऊन शिरूर पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करीत आहेत.
हि कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र थोरात, शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, विद्याधर निचित, जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अक्षय नवले, काशिनाथ राजापुरे, प्रमोद नवले, अक्षय जावळे यांनी केलेली आहे.