साताऱ्यातील पाटण तालुक्यात शिवसेनेचा १३ ग्रामपंचायतींवर तर राष्ट्रवादीचा ५ ग्रामपंचायतींवर विजय
कोल्हापूर – हातकणंगले – पाडळी – जनसुराज्य पक्ष
कोल्हापूर – शिरोळ – गणेशवाडी – भाजप
सातारा – कराड – खुबी – भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल
सोलापूर – माळशिरस – तिन्ही ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाकडे
सोलापूर – अक्कलकोट- मोट्याळ- कार्तिक पाटील पॅनेल
कोल्हापूर – इचलकरंजी – मिणचे – शिवसेना
कोल्हापूर – कोपर्डे – काँग्रेस
कोल्हापूर – करवीर – गाडेगोंडवाडी – शेकाप- काँग्रेस -राष्ट्रवादी महाआघाडी
औरंगाबाद – आडगाव – महाविकास आघाडी विजयी
सोलापूर – कारकल – नऊ जागांवर देशमुख पॅनल
सोलापूर – केडगाव – संजयमामा शिंदे पॅनल
अहमदनगर – हिवरे बाजार – पोपटराव पवार पॅनल
कोल्हापूर – भुदरगड – बारवे – प्रकाश आबिटकर पॅनल
सातारा – कराड – शेनोली शेरे – अतुल भोसले पॅनेलचा एकतर्फी विजय, पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का
कोल्हापूर – इचलकरंजी – नृसिंहवाडी – सत्ताधारी दत्तराज आघाडी
उस्मानाबाद – अरणी – सर्वपक्षीय महाविकास आघाडी ९ पैकी ९ जागेवर विजयी
सोलापूर – सागर सोलापुरेंचं पॅनल ९ जागांवर विजयी, सिद्धराम म्हेत्रे पॅनलचा धुव्वा
सोलापूर – कारकलमध्ये ९ जागांवर देशमुख पॅनलचा विजय, इंडी पॅनलला धक्का
कोल्हापूर – करवीर – म्हालसवडे ग्रामपंचायत – स्थानिक आघाडी ९ पैकी ९ विजयी
कोल्हापूर – करवीर – कोगे – शिवसेना
औरंगाबाद – धोंडखेडा – हरिभाऊ बागडेंच्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर भाजप विजयी
कोल्हापूर – इचलकरंजी – चंदुर – प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वात ग्राम विकास आघाडीला १७ पैकी १४ जागा
कोल्हापूर – कागल – पिंपळगाव (बु) मुश्रीफ-मंडलिक गटाची बाजी
सातारा – फलटण – रामराजे गटाला साखरवाडी गावात मोठा धक्का, १७ पैकी १० जागेवर माजी सरपंच विक्रम भोसले पॅनेलचा विजय
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात पहिल्या ३ जागा शिवसेनेने जिंकल्या
पाटण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींचे निकाल हाती, आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व, शिवसेनेचा १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाच ग्रामपंचायतींमध्ये विजय. मूळगाव, वाडी कोथावडे, कोकस्थळे, धावडे, गोकुळ, पेठ शिवापूर, त्रिपुरी, चोपडी, शिंदेवाडी, सोनवडे, उंबरळी, काहिर, चोपदारवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ढोंगळेवाडी, कारोळी, तांबकडे, नॅचल, कामरगाव या पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. धाराशिव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या मूळ गावी पळसप येथे महाविकास आघाडीविरूध्द भाजपात थेट लढत, एकूण जागा १३, ८ जागा बिनविरोध होत्या ५ जागांसाठी मतदान, महाविकास आघाडी विजयी
राष्ट्रवादी ७
शिवसेना ५
अपक्ष १ बंडखोर शिवसेना