आळंदी I झुंज न्यूज : महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार आळंदी देवाची येथील ग्रामीण रुग्णालयात भाजप महिला मोर्च्याच्या वतीने पाहणी करण्यात आली. या वेळी रुग्णालयातील माहितीचा अर्ज भरून घेण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, आळंदी देवाची नगराध्यक्ष वैजैनता उमरगेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य कोमल काळभोर, पिंपरी चिंचवड सचिव शोभा भराडे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा चिटणीस प्रज्ञा हिटनाळीकर, आळंदी देवाची येथील नगरसेविका रुक्मिणी कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.
“ भंडारा येथील ग्रामीण रुग्णालयात आगीची घटना घडून त्यामध्ये बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्नालयात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना भाजपा महिला प्रदेश कार्यकारणीकडून देण्यात आल्या. त्या अनुषंगाने आळंदी देवाची येथील ग्रामीण रुग्णालयात भाजपा महिला मोर्चाकडून पाहणी करण्यात आली.
या मध्ये रुग्णालयातील डॉक्टर संख्या, शिशु अतिदक्षता विभागातील बेडची संख्या, कर्मचार्यांची संख्या, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदींची माहिती घेण्यात आली. तसेच आळंदी देवाची येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जे. जे. जाधव यांना निवेदन देण्यात आले.