माढा I झुंज न्यूज : माढा तालुक्यातील उपळवटे येथिल श्री भैरवनाथ मंदिरा जवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आडामध्ये भरपुर प्रमाणामध्ये पाण्यावरती तरंगत असलेला केरकचरा उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांना दिसला त्यांनी लगेच तातडीने पाण्यामधील कचरा काढुन पाणी निर्मळ व स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला.
“ पाणी हेच जीवन आहे असे समजुन मानवी जीवन जगत असताना पाणी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे एक वेळेस अन्न नसले तरी मानुस जीवंत राहु शकतो पण पाण्याशिवाय मानुस जगु शकत नाही याचं महत्त्वकांक्षातुन उपळवटे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ज्या आडावर संपूर्ण गाव अवलंबून आहे या आडामध्ये कचऱ्याच्या घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसुन आले याची खंत सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी व्यक्त केली.
संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित असलेले उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे व एकनाथ जाधव दिपक लोंढे आण्णा घोरपडे उदय लोंढे या सर्वांणी कोणताही राजकीय हेतू न बाळगता तारेवरची कसरत करुन आडामधील कचरा काढुन पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी उपळवटे गावचा एक नागरिक म्हणून थोडाफार चांगले काम करण्याचा प्रमाणीकपणा यांनी दाखविला आहे.
उपळवटे गावातही जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात यावे अशी सर्व उपळवटे ग्रामस्थांनची प्रमुख मागणी आहे असे उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी सांगितले. यावेळी उपळवटे गावचे वडार समाजाचे युवा नेते एकनाथ जाधव, दिपक लोंढे रणजित घोरपडे, उदय लोंढे सुनिल काका खुपसे, कृष्णा तळेकर, संदिप घोरपडे उपस्थित होते.