पुणे | झुंज न्यूज : मार्क फोर प्रोडक्शन सादर आणि चंद्रभागा फिल्म प्रोडक्शन निर्मित चला दंगल समजून घेवु ! या ‘वेबसिरिजचा उद्घाटन सोहळा कोथरूड येथील आयकर कॉ हौ सोसायटी येथे संपन्न झाला.
“चला दंगल समजून घेवु! ही संवेदनशील वेबसिरीज नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी नवा विचार देणारी संकल्पना ठरणार आहे. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, निर्माते जीवन जाधव, चंद्रभागा फिल्म प्रोडक्शन कार्यकारी निर्माते कुमार मगरे यांच्या उपस्थितीत पार पडला . या वेब सिरीज मध्ये अभिनेत्री ईला भाटे, रेशम टिपणीस, अस्ताद काळे, अक्षय वाघमारे, सुनील गाडगीळ, नितीन धांदुके यांचा मुख्य सहभाग आहे. तसेच डी ओ पी करण तांदळे , असोसिएट दिग्दर्शक संजय रावल आणि संगीत देवदत्त बाजी यांनी केले आहे.येत्या काही दिवसात पिंग पॉंग या ओ टी टी चॅनल वर ही वेब सिरीज दिसणार आहे.
प्रेक्षकांना या नववर्षाची मेजवानी म्हणून या वेबसिरीजच्या दिग्दर्शनापासून वेबसिरिजचे कथा, पटकथा आणि संवाद लेखन अभिनेते विक्रमजी गोखले यांनी केले आहे. या वेबसिरिजच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या महत्त्वाच्या विषयाला प्रकाश झोतात आणण्याचा हेतू असून तरुणाईच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसिरिजमधून मिळतील, अशी खात्री अभिनेते विक्रम गोखले यांना वाटते.