सांगवी I झुंज न्यूज : कोरोना महामारीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करीत समाज जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी केले याबद्दल कृतज्ञता म्हूणन लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप, सांगवी शाखेतर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
“झुंज न्यूज” चे उपसंपादक प्रसाद वडघुले आणि “दै. लोकमतचे” वार्ताहार संदीप सोनार यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी डांगेचौक शाखेचे सल्लागार व सरस्वती क्लासेसचे संचालक महेंद्र शिखरे, सांगवी शाखेचे सल्लागार सुनीता शरद ढुमरे, सह व्यवस्थापक कौठेकर सर व शाखेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
“जहा न पहुंचे सरकार, वहा पहुंचे पत्रकार, असे देशभरात पत्रकारांचे एक वेगळे स्थान आहे. डॉक्टर्स, पोलीस, यांप्रमाणेच कोरोना काळात पत्रकारांनी जनजागृतीचे काम मनोभावाने करुन मोलाचे योगदान दिले. देशावर कोणतेही संकट आले तर एकमेकांचे मतभेद दूर सारून एकजुटीने काम करण्याची देशाची संस्कृती आहे. त्याप्रमाणेच पत्रकारांकडून आपले कर्तव्य चांगल्यारितीने नेहमीच जपले जात आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा सत्कार करण्यात आला.”