पिंपरी I झुंज न्यूज : इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन जणांमध्ये अधिक प्रभावशाली असलेला करोना म्हणजे यूके स्ट्रेन आढळून आल्याचं समोर आलं आहे. या तिघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर, आणखी एका प्रवाशाचा तपासणी रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे आता पिंपरीकरांची चिंता काहीशी वाढल्याचे दिसत आहे.
२६८ प्रवाशी इंग्लडमधून मुंबईमध्ये उतरले होते त्यांचा शोध महानगरपालिकेने घेतला. त्यापैकी संशयित सात जणांचे नमुने पुण्यातील NIV ला पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला व तीन जणा यूके स्ट्रेन करोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर,अद्याप एका प्रवाशाचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.