अहमदनगर | झुंज न्यूज : बहुजन भिमसेना महाराष्ट्र राज्य प्रणीत आदिवासी पारधी परिवत॔न आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष वैभव सुनिल काळे यांना बहुजन भिमसेना पक्षाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील बाबुळगाव दुमाला येथुन उमेदवारी देण्यात आली आहे. नुकताच वैभव काळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
“सपुंण महाराष्ट्रातुन सरपंच पदासाठी फासेपारधी समाजातील वैभव काळे हे एकमेव उमेदवार आहेत. त्यामूळे समाजातील लोकांनी वैभव काळे यांना मनमोकळेपणाने मतदान करून निवडुन आनावे असे आवाहन करण्यात आले आहे.”
बहुजन भिमसेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहनराव म्हस्के आणि आदिवासी पारधी परिवर्तन आघाडी अध्यक्ष शरद सनस पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या उमेदवारीचा निण॔य घेण्यात आला. यावेळी आदिवासी पारधी परिवर्तन आघाडीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सावकार भोसले, बहुजन भिमसेना पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगन्नाथ पवार, जेष्ठ नागरिक संघाचे अहमदनगर उपाध्यक्ष शाकीर भाई पठाण, प्रविण काळे, सुनिल काळे सुधा भोसले, प्रकाश काळे उपस्थित होते.