मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना विभागप्रमुख संतोष वाळके यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
दिघी I झुंज न्यूज : शिवसेना दिघी शाखेच्या वतीने तसेच कै.तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान व कै. सूजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात विक्रमी ६०३ नागरिकांनी रक्तदान केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना विभागप्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे डिजीटल व रेड प्लस ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे औपचारिक उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, शहर प्रमुख योगेश बाबर, कृष्णा वाळके, ज्ञानेश्वर वाळके, माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, दिघी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, अशोक वाळके, सुरज लांडगे, किरण गवारे, राहुल गवारे, देविदास मदनकर, निवृत्ती येळवंडे, रामदास परांडे, प्रभाकर कदम, काळुराम वाळके, रमेश वाळके, अशोक वाळके, पोपटराव शिंदे, अविनाश लोणारे, सागर राणे, नवनाथ परांडे, ऋषिकेश वाळके, बापू परांडे, नितिन परांडे, सुरज वाळके, दत्तात्रय वाळके, सोपान वाळके, ज्ञानेश्वर वाळके, लक्ष्मण तुपे, दत्तात्रय हरिभाऊ वाळके, एकनाथ वाळके, सारिका संतोष वाळके, पौर्णिमा एकनाथ वाळके, निलेश कुंभार, प्रशांत निंबाळकर, शुभम वाळके, बंटी वाळके, संतोष घोलप, कैलास कुदळे, निलेश वाळके, गौरव आसरे, योगेश वाळके, राहुल ओवले, संकेत परांडे, खंडू परांडे, पप्पू तुपे, सुरज साठे, बंटी घुले, ईश्वर सवई, सतिश संकपाळ उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी संतोष तानाजी वाळके यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत रक्तदानाची गरज अधोरेखित केली आणि रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुमारे सहाशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांची ही विक्रमी संख्या मानली जाते . सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळ पर्यंत नागरिकांनी अक्षरशः रांगा लावून रक्तदान केल्याचे चित्र यावेळी दिघी परिसरात पहावयास मिळत होते.