शिरूर | झुंज न्यूज : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कंटेनर – दूचाकीचा भिषण अपघात होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे टाकळी भिमा व उरळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
किरण माणिकराव गिरमकर (वय २३ रा उरळगाव) आणि रवि अशोकराव भंडलकर (वय ३५ रा टाकळी भिमा ता शिरूर) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि २५) दूपारी हाॅटेल राजेंद्र चौक रांजणगाव येथे घडली.
एम आय डि सी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो एम एच १२ आर एच ९६०९) दुचाकी (एम एच १२ एल क्यूं १५४७ ) चा अपघात झाला. रांजणगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत अधिक तपास करत आहेत.