पुणे | झुंज न्यूज : कोकणी उत्पादनांसाठी कोकण मार्केट विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्लोबल कोकण हेल्थ फूड योजना, कोकण आर्थिक विकास अभियानास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती ‘ग्लोबल कोकण अभियान’ चे प्रमुख संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे दिली.
कोकणात प्रचंड परिश्रम करणारे मच्छिमार, आंबा बागायतदार शेतकरी, कोकणी उत्पादने निर्माण करणारे युवा उद्योजक, पूर्ण रसायनविरहित नैसर्गिक ऑरगॅनिक धान्य आणि कडधान्य पिकवणारे शेतकरी यांना थेट बाजारपेठ मिळावी. यांना त्यांच्या परिश्रमाचा अधिक मोबदला मिळावा आणि मुंबई – पुणेकरांना नैसर्गिक ऑरगॅनिक आरोग्यदायी उत्पादने घरपोच मिळावी त्याकरिता एक सुनियोजित अभियान ग्लोबल कोकण सुरु आहे.
कोकणातील हापूस आंबा, काजू, मसाले, कृषी उत्पादने, कोकणातील मासे यांचे ग्लोबल ब्रँड कोकणातील युवा उद्योजक यांच्या मदतीने ग्लोबल कोकणच्या माध्यमातून विकसित करीत आहोत आणि हि उत्पादने मुंबई, पुणे, नाशिक येथे घराघरात घरपोच उपलब्ध होतील अशी एक व्यवस्था उभारत आहोत. मुंबई, महाराष्ट्र आणि जगभरात कोकणातील उत्पादनांचे मार्केट विकसित करण्याचा संकल्प केला आहे.ही उत्पादने घराघरात पोचवण्याचे काम ग्लोबल कोकणचे कार्यकर्ते कोकणदूत करतील. यातून हजारो उद्योजक संपूर्ण कोकणात आणि मुंबई, पुणे,नाशिक, ठाणे परिसरात विकसित होऊ शकतील,असे संजय यादवराव यांनी सांगितले.
ही उत्पादने नियमितपणे आपल्याला मिळावी याकरता ग्लोबल कोकण हेल्थ फूड योजनेचा सहभागाचा गुगल फॉर्म
https://forms.gle/Hb3bV8EbyJzR6sXv9
या लिंक वरून भरून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत कातकर 9082781551 यांच्याशी संपर्क साधता येईल .