फलटण I झुंज न्यूज : आदिवासी पारधी परिवर्तन आघाडीच्यावतीने फलटण येथील सांगवी गावात महत्व पुण॔ बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक बहुजन भिमसेना संस्थापक अध्यक्ष मोहनराव म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. यावेळी आनेक पदाधिकारी याना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले आहे.
यावेळी फलटण तालुक्यातील पारधी समाजातील लोकांना पोलीस खात्याकडुन खबरी यांच्या सांगण्यावरून खोटेनाटे गुन्हे दाखल करून भयंकर त्रास देण्यात येत आहे. हे यावेळी लक्षात आले कि कुठल्याही प्रकरणाची चौकशी न करता खुना सारख्या गंभीर गुन्ह्यात देखील निष्पाप लोकांना बळीचा बकरा करून त्याला तुरूंगात टाकले जात आहे. काही पोलीस अधिकारी यांनी खास खबरी पाळुन ठेवले आहेत त्यांच्या सांगण्यावरून पारधी समाजातील लोकांवर आन्याय अत्याचार होत आसतील तर या आन्याय आत्याचारा विरोधात संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.
या वेळी बहुजन भिमसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहनराव म्हस्के, आदिवासी पारधी परिवत॔न आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शरद सनस पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष शादीक भोसले, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सावकार भोसले, आदिवासी पारधी परिवत॔न आघाडी महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष वैभव काळे, सातारा जिल्हाध्यक्ष आनिल पवार, सातारा जिल्हा महीला आघाडी अध्यक्षा आक्षदा पवार, फलटण तालुका अध्यक्ष प्रेम काळे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष आकर्षण पवार, सातारा जिल्हा महीला आघाडी काय॔ध्यक्षा मनीषा शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष महेश शिंदे, एम डी ग्रुप (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद ढवळसकर आणि आदिवासी पारधी परिवत॔न आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबुराव पवार आ या बैठकीत उपस्थित होते.