पुणे | झुंज न्यूज : जगभरात अनेक लोक करोना लसीकडे डोळे लावून बसले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे.
ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.
एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे.