दौंड | झुंज न्यूज : शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुका शिवसेना डॉक्टर सेल आणि शिवसेना दौंड विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मलठण येथील विठ्ठल मंदिरातील विठुरायास पुष्पहार अर्पण करून या शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिराचा सामाजिक अंतर राखत नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
यावेळी ४५९ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यामध्ये २५० जणांची कॅल्शियम टेस्ट करण्यात आली तर ५० जणांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले. आणि त्यांना माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मोफत मधुमेह तपासणी , ईसीजी , दंत तपासणी , हाडांची तपासणी आदी विविध तपासण्या यावेळी मोफत करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर , शिवसेना डॉक्टर सेलचे तालुका प्रमुख डॉ. प्रमोद रंधवे, पंचायत समिती मा. सभापती ताराबाई देवकाते, शिवसेना महिला आघाडीच्या छाया जगताप, मलठण विकास सोसायटीचे अध्यक्ष उज्वला शेळके, उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, विभाग प्रमुख काका परदेशी, विजय चव्हाण युवासेना समन्वयक समीर भोईटे, शाखाप्रमुख आबासाहेब देवकते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोफत करण्यात आल्या. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. पांडुरंग गावडे, डॉ.विशाल मेहता, डॉ.सुनील ढाके, डॉ. अनिल पाटील यांचे बहुमुल्ल्य सहकार्य लाभले.