पिंपरी I झुंज न्यूज : आकुर्डी सोशल फाउंडेशनच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आकुर्डी येथे उत्साहात पार पडला. दत्तवाडी विठ्ठलवाडी या भागातील ५८ मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी जाधव, द्वितीय क्रमांक नागेश गायचोर आणि तृतीया क्रमांक अथर्व शिंदे यांनी मिळवला. स्पर्धकांना फाउंडेशन च्या वतीने ट्रॉफी देण्यात आली. नवीन पिढीतील मुलांना इतिहास कळावा किल्ल्यांचे महत्त्व समजावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन आकुर्डी सोशल फाउंडेशनचे संस्थापक के.के कांबळे, अध्यक्ष वाहिद पटेल, यांनी केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे ओबीसी संघर्ष सेना शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. मनसे युवा कार्यकर्ते आशिष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल काळे पाटील, नवनाथ ढेरंगे, डॉक्टर घोरपडे, सचिन निकम, योगेश गोकुळे कार्यक्रमाला उपस्थित होते.