दिवाळी फराळ सोबतच रंगली गप्पांची मैफिल
थेरगाव | झुंज न्यूज : सालाबाद प्रमाणे या वर्षीही डांगेचौक येथील मोरेश्वर मंदिरात मंदिरात थेरगाव सोशल फाऊंडेशनकडून दिपोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी शेकडो पणत्यांच्या लखलखाटाने मंदिर परिसर उजळून निघाला. मंदिराच्या प्रांगणात भव्य रंगोळीही काढण्यात आली होती. परिसरातील शेकडो नागरिक येथील दीपोत्सवात सहभागी झाले होते.
गेल्या ८ महिन्यांपासून विस्कळीत झालेले जनजीवन हळु हळु पूर्वपदावर येत आहे. त्यामूळे या उत्साहात आणखीन भर पडावी यासाठी पाडव्याच्या दिवशी फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळाचेही आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ज्येष्ठ, आप्तेष्ट, मित्रमंडळीची फराळासोबत गप्पांची चांगलीच मैफिल रंगली.
फाऊंडेशनचे अनिकेत प्रभू, निलेश पिंगळे, राहूल सरोदे, अनील घोडेकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने दीपोत्सव उत्साहात पार पडला.