पुणे | झुंज न्यूज : विधान परीक्षा व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक २०२० चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत आचारसंहिता राहणार आहे. १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर २०२० रोजी मतमोजणी होणार आहे.
आचारसंहिता सुरु झाल्यापासून मतमोजणी पुर्ण होईपर्यंत विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार निवडणुक होणाऱ्या ५ डिसेंबर २०२० चे १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.
विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोटनिवडणूक २०२० ची संपुर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावारणात पार पाडणाच्या दृष्टीकोनातून शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.
निवडणूक कालवधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय आधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये, व विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढणे, मोर्चा काढणे, सभा घेणे उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे इत्यादी, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.