पुणे I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्यपदी अभिनेता व दिग्दर्शक कुणाल देशमुख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात हा नियुक्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता.
चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अनिल गुंजाळ, संजय ठुबे, कार्यकारी निर्माते स्वानंद देव, गीतकार समर कांबळे, अभिनेते प्रमोद साखरे, दिग्दर्शक प्रशांत जाधवर, अभिनेत्री शितल केंकाण, अभिनेते प्रशांत बोगम, डी.ओ.पी. मयुर जोशी, सोमनाथ चव्हाण आणि दिग्दर्शक कौस्तुभ कुलकर्णी उपस्थित होते.
“कुणाल देशमुख बऱ्याच वर्षापासून कला क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या चित्रपट क्षेत्राकडे वळणाऱ्यांचा कल अधिक आहे. अशावेळी नवोदितांची कसल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.”