पुणे I झुंज न्यूज : ३५० व्या शिव राज्याभिषेकनिमित्त “विद्यार्थी कुस्ती परिषद” महाराष्ट राज्य (वर्षे ४ थे) यांच्याकडून दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षीही रविवार दिनांक २ जून २०२४ रोजी महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड, पुणे भव्य युवा कुस्ती मैदान भरवण्यात आले होते. यंदा १२० मल्लांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ३० मुलींच्या तर ९० मुलांच्या कुस्ती घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास नाना दांगट, प्रसिद्ध उद्योजक जवाहर शेठ चोरघे, क्रीडा संघटक डॉ.मदन कोठुळे सर, माजी नगरसेवक दिलीप काळोखे , राजेंद्र बलकवडे, शिवसंग्राम संघटनेचे उपाध्यक्ष भरत लगड, पै.भास्कर मोहोळ, नामदेव मानकर, वस्ताद संभाजी अप्पा शिंदे, बुवाजी लिमन , मराठा महासंघ पुणे शहर सरचिटणीस गणेश मापारी, कार्याध्यक्ष अमर पवार,राकेश गायकवाड, तसेच सारिका पारेख,सौ.श्रुतिका पाडळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत पंच म्हणून राजू कदम, तुषार गोळे ,संदीप जगदाळे, प्रदीप पवार, निकुंज उभे , संतोष थरकुडे यांनी काम बघितले. या कार्याक्रमचे आयोजन विद्यार्थी कुस्ती परिषद चे अध्यक्ष युवराज दिसले यांनी केले होते. सूत्रसंचालन पै. श्याम शिंदे यांनी केले तसेच पाहुण्यांचे स्वागत सचिन वडघुले यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पवार यांनी केले.
विजेता व उपविजेता मल्लास ट्रॉफी व मिडेल भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे प्रो.प्रा, भरत विलास गायकवाड यांनी दिले तर कात्रज दुध पुणे जिल्हा संघ चे संचालक अॅड. स्वप्नील दादा ढमढेरे यांनी सर्व मल्लास मोफत ताक उप्लाध करून दिले. व वस्ताद पै.पंकज हरपुडे यांनी कुस्ती मॅट उप्लाध करून दिले.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास नाना दांगट यांनी कुस्ती क्षेत्रासाठी लोकांनी पुढाकार घेऊन मल्ल घडविले पाहिजे असे सांगितले वस्ताद बुवा लिमन यांनी पुण्यातील कुस्तीचा इतिहास सांगितला वस्ताद अप्पा शिंदे यांनी युवा म्माल्लांनी कुस्ती बरोबर शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले व डॉ.मदन कोठुळे सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील येणाऱ्या अडचणीवर कश्या पद्धतीने मात करता येते हे सोप्या पद्धतीत मल्लांना मार्गदर्शन केले.