पुणे I झुंज न्यूज : दत्ता दळवी निर्मित ‘भुंडीस’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर सोहळा प्रेक्षकांच्या भव्य प्रतिसादात १७ मे ला नुकताच पुणे येथे पार पाडला. ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होतीच. आणी आता ‘भुंडीस’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटला भरभरून प्रेम देत आहेत. महाराष्ट्रभर चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत.
‘भुंडीस’हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमात अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यात उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच प्रत्येकाला स्वत:चे वाटतील. चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेवून जातो. चित्रपटामध्ये आपण जे क्षण पाहतो त्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडला जाईल.या कथेद्वारे सामान्यातून असमान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते.ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल.या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे.सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रेरणा आणि उर्जेचा स्त्रोत घेवून बाहेर पडतील याबाबत दुमत नाही.
चित्रपटाला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आपला आनंद व्यक्त करताना निर्माते दत्ता दळवी सांगतात की,प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळाला त्यामुळे मी कृतकृत्य झालो. भुंडीस वर जसं प्रेम केल आहे तसंच यापुढे ए स्क्वेअर ग्रुप आणि माझ्या निर्मितीवरही प्रेम करत राहा.प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मी त्यांचा ऋणी आहे.
चित्रपटाचे निर्माते दत्ता बापुराव दळवी असून दिग्दर्शक वैभव राजेंद्र सुपेकर हे आहेत.चित्रपटातील संगीताची आणि लेखकाची धुरा सोमनाथ संभाजी तांबे यांनी सांभाळली असून गायक म्हणून आदर्श शिंदे, नंदेश उमप, राखी चौरे, निधी हेगडे हे लाभले आहेत.
या चित्रपटामधे भरत शिंदे यशराज डिंबळे , रामभाऊ जगताप, माणिक काळे,सुरेखा गव्हाणे,कुमार पाटोळे, अश्विन तांबे, अनुष्का बेनके, सुभाष मदने, अविनाश कीर्ती, शितल आदमाने, श्वेता परदेशी व पाहुने कलाकार माधव अभ्यंकर, मेघराज राजे भोसले , आशुतोष वाडेकर नवनाथ काकडे आदी उत्कृष्ट कामगिरी बजवाताना दिसतात.
चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन सागर रोकडे, आरती गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन भास्कर ठोकळ यांचे असून कलादिग्दर्शन सुभाष भनभने, सचिन इचके, ऋषि मखर यांचे आहे, मेकअप जगदीश चव्हान यांचा आहे, प्रशांत बोगम व बंटी यांनीं प्रॉडक्शन सांभाळले तर मुख्य सहायक दिग्दर्शक विशाल डोरले असुन कार्यकारी निर्माते संदीप काकडे आहेत.
निर्माते दत्ता दळवी हे दौंड तालुक्यातील नानगांव या गावातुन पुन्यासारख्या शहरा मधे येऊन त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रामधे चांगलेच नाव मिंळवले आहे. निर्माता म्हनुन दत्ता दळवी यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या आधी त्यांनी मराठी नाटकांची निर्मिती केलेली आहे, रायगडाला जेंव्हा जाग येते व इथे ओशाळला मृत्यु या एैतिहासिक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर सु्ध्धा त्यानी केले, जस्ट गम्मत, वरात घुसली घरात, पुन्हा दोघे राजा रानी ही त्यांची विनोदी नाटके सुद्धा आहेत. येड्यांचा बाजार ही त्यांनी निर्मित केलेली वेब सिरीज MX player या OTT प्लेटफ़ॉर्म वर बर्याच दिवसापासुन सुरु आहे.