जनता गँरेज वाहतुक संघटना ५० रुपये अतिरिक्त दंड निर्णयावर आक्रमक
पुणे I झुंज न्यूज : रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) अनिवार्य असते. मात्र, अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवरती त्याची तपासणी करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र आता, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास पन्नास रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारला जाणार आहे.
यासंदर्भात ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघ तसेच जनता गँरेज वाहतुक संघटना यांच्यावतीने या संदर्भात परिवहन आयुक्त विवेक भिमराव यांना निवेदन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने सामान्य रिक्षाचालकावर लादलेला फिटनेस आतिरीक्त दंड प्रतीदिवस ५० रुपये हा अन्याय कारक आहे. असे या निवेदनात म्हणले आहे.
कोरोना आला, त्यात दोन आडीच वर्षे गेली त्यानंतर फायनान्सचा प्रॉब्लेम त्यात ओला ऊबर प्रति भाडे प्रमाणापेक्षा कमी पैसे देणे… आणि आता शासनाचा हा निर्णय आम्हाला परवडण्या सारखा नसुन आम्हाला योग्य न्याय द्यावा अन्यथा आम्हाला सहकुटुंब आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आलेली आहे.
यावेळी जनता गँरेज अध्यक्ष सचिन वैराट, सचिव आलताफ शेख, सोमनाथ म्हस्के, रमेश तोरडमल, संतोष दिवटे, राज्य अध्यक्ष महेश चौगुले, भाई चरनदास वानखेडे, मचिंद्र कांबळे, आतिश शिंदे, राजेश रसाळ, रफिक खतिब, सुरेश शिंदे यासह अनेक रिक्षा चालक उपस्थित होते.