सांगली I झुंज न्यूज : सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी ऊसाच्या फडात गांजा शेती केली जात असल्याचं उघड झालं. यानंतर सांगली पोलिसांनी छापा टाकून शेती उद्ध्वस्त केली आणि गांजाची १४७ किलो वजनाचा ओला गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाच्या झाडांची किंमत तब्बल १७ लाख आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेंडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी सांगली जिल्हयात गांजाची लागवड करणाऱ्या आणि गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाईसाठी पथक तयार केले होते.
“पोलिसांनी उमराणीतील ऊसाच्या फडात छापा टाकून गांजा शेती उद्ध्वस्त केली. यावेळी सुमारे १७ लाख ७६ हजार किंमतीची १४७ किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी शेतमालकाला अटक करण्यात आली.”