प्रथम क्रमांक पटकावत मुळशीसह, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात उमटवला ठसा
मुळशी I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या आंतरशालेय नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावून परत एकदा पुण्याबरोबरच पिंपरी -चिंचवड येथील शाळांमध्ये देखील पेरीविंकल च्या सूस शाखेने एक मानाचा तुरा रोवला आह़े.
बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी MANCH -24 (मंच-24) आयोजित आंतरशालेय नृत्यस्पर्धेचे आयोजन हे पुणे रेकॉर्ड्स तर्फे चिंचवड येथील एलप्रो या आलिशान प्रेक्षागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 हुन अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात प्रियदर्शनी स्कूल , पोद्दार स्कूल, लिटिल गॅलगझी स्कूल, पेरिविंकल स्कूल, SNBP स्कूल अशा अनेक पिंपरी चिंचवड, चाकण, बाणेर या भागातील शाळा सहभागी झाल्या होत्या.
कोणतीही थीम घेऊन नृत्य सादरीकरण करण्याकरिता पुणे पिंपरी चिंचवड मधून प्रत्येक वयोगटातील 50 पेक्षा अधिक गटांनी यात भाग घेतला होता . त्यातील पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल च्या सूस शाखेतील इयत्ता 6 वी तील विद्यार्थ्यांनी तानाजी या वर आधारित अतिशय रोचक असा अभिनय सादर केला. या परफॉर्मन्स ने व विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून केवळ मुळशीतच नव्हे तर पुण्याबरोबर पिंपरी चिंचवड भागात सुद्धा आपला ठसा उमटवून शाळेची व शिक्षकांची मान उंचावून गौरवास्पद बक्षीस पटकावले आह़े . यात एकूण 19 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी चे मानचिन्ह व (15000/- ) पंधरा हजार रुपयांचे रोख बखिस असे बक्षिसांचे स्वरूप होते. हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पेरिविंकल च्या सूस शाखेने जिंकून बाजी जिंकली. केवळ अभ्यासातच नव्हे तर अभ्यासाव्यतिरिक्त व शाळाबाह्य जाऊन कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे ही महत्वाची बाब सूस शाखेच्या बाबतीत वाखाणण्याजोगी आह़े .
पुस्तकातील अभ्यास तर रोजच विद्यार्थी शिकत असतात पण पुस्तका पलीकडे जाऊन अशी शाळाबाह्य स्पर्धेत उतरून टक्कर देणे हे आजकालच्या स्पर्धात्मक जगात अतिशय महत्वाचे आह़े व स्पर्धात्मक जगात टिकून राहून बक्षीस पटकावत आज आत्मविश्वास निर्माण करून स्वतःचे व शाळेचे नाव उज्वल करण्याचा एक प्रयत्न व त्यातून येणारा अनुभव व अनुभवातून मिळणारा आनंद आज पेरिविंकल च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला.
या संपूर्ण शाळाबाह्य स्पर्धेचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी सर यांचा यात मोलाचा वाटा व सहभाग होता . शाळेच्या मुख्याध्यापिका, इयत्ता 6वी च्या वर्गशिक्षिका यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग या सर्वांच्या कष्टाचे फळ व पालकांचा उत्तम प्रतिसाद व पाठिंबा याचे फळ म्हणजेच हे प्रथम पारितोषिक आहे असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल सर यांनी करून सर्वांचे अभिनंदन केले.