पिंपरी । झुंज न्यूज : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे.. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली.. या घटनेचा मराठी पत्रकार परिषद सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
https://zunjnews.in/wp-content/uploads/2024/02/video.mov
पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले म्हणले की, जेव्हा विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही तेव्हा असे भ्याड हल्ले होतात.. सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घडतंय ते संतापजनक आणि चिंताजनक आहे..
मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात एका बाजुला गोळ्यांचे आवाज येत आहे.. महिन्यात पाच ठिकाणी गोळीबार झाले आहेत आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडूनच पत्रकार आणि बुध्दिजिवींवर हल्ले केले जात आहेत.. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे.. हे चित्र भयंकर असल्याने त्याचा विरोध झालाच पाहिजे.. या झुंडशाहीच्या विरूध्द सर्वांनी व्यक्त झालं पाहिजे..
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा त्रिवार धिक्कार…