पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट सेंटरचे 21 खेळाडू व के के डब्ल्यू पिंपळगाव कॉलेजचे 9 खेळाडू यांची महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड झालेली आहे. या खेळाडूंना पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्सचे अध्यक्ष व मा. नगरसेवक सिद्धेश्वरदादा बारणे आणि मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड कित्येक दिवस चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच प्रयत्नांना आता यश मिळत हे खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये भोपाळ मध्य-प्रदेश येथे पार पडणार आहे.
कायाकींग व कानोईंग या खेळामधील ड्रॅगन बोट इव्हेंट मध्ये एकूण 21 मुले व 7 मुली या स्पर्धसाठी पत्र ठरले असून ते आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.