– बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
हिमगौरी बिल्डिंग २१ सेक्टर २१ स्कीम १०,
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
मो. 9890567468
दुःख नांदते सुखाने, सुख कण्हते ओझ्याने
यावी कशी ती समता भेद ते तुझ्या माझ्याने
लाव्हा वाहतो अंतरी असूयेचा, विद्वेषाने
मन भरले विषाने पूर्वग्रह आमिषाने
नवे खेळ त्यांचे तुटली नाती अविश्वासाने
टपले संधीसाधू लाभ उठवाया फुटीने
दुखावली मने शब्दांच्या त्या कटू वाग्बाणाने
दुरावली माणसे आपली आपल्या हेक्याने
सांगून कारण वयाचे काढली समर्थने
आपल्यांचीच सुरू झाली टीकांची आवर्तने