दौंड I झुंज न्यूज : बोरमलनाथ मंदिर, चौफुला येथे स्व. नानासाहेब फडके साहित्य नगरी मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि भीमथडी मराठी साहित्य परिषद आयोजित द्विदिवसीय राज्यस्तरीय दुसरे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
द्वितीय सत्राचे कविसंमेलन मा.रा वि शिशुपाल यांच्या अध्यक्षतेखाली झाले.मंचावर आयोजक श्री. दशरथ यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा, हायकोर्ट जलदगती न्यायाधीश वसंतराव पाटील उपस्थित होते.
प्रथम वाय के शेख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रामदास वाघमारे,गौतम चाबुकस्वार, बाबू डिसोजा, मदन देगावकर, प्रमोद जगताप, माधुरी डिसोजा, योगीराज कोचाडे हिंगणाघाट, बेबीताई बोईनवाड नांदेड, डॉ संगिता घुगे, सुवर्णा वाघमारे, संगिता ताकवणे, वाय के शेख, विश्वास ताकवणे, देवेंद्र गावंडे, पांडुरंग म्हस्के, शांतीलाल ननावरे, प्रा अशोक शिंदे, संजय भोरे, बी डी गायकवाड
आदिंच्या विविध कवितांनी रंगत आणली.
मा. प्रथितयश कवी जगदीप वनशिव आणि स्वाती बंगाळे यांनी या कवीसंमेलनाचे सुरे़ख सूत्रसंचालन केले. सहभागी कवींना मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.