बस ५० फूट खोल दरीत कोसळली ; १० भाविकांचा मृत्यू तर ५० हुन अधिक जण जखमी
जम्मू I झुंज न्यूज : देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसचा मंगळवारी अपघात झाला. बस जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 55 जण जखमी झाले आहे. जखमींनी जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू जिल्ह्यातील कटरा येथून सुमारे 15 किमी अंतरावर झज्जर कोटलीजवळ बस अपघात झाला.
55 जण जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसली. ही बस अमृतसरहून कटराला जात होती, ज्यामध्ये बहुतांश प्रवासी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी होते. या अपघातासंदर्भात बोलताना जम्मूचे उपायुक्त (डीसी) अवनी लवासाने यांनी सांगितले की, बस अपघातमध्ये10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी आहेत. अपघातामध्ये 55 जण जखमी झाले आहे. बस अमृतसरहून कटराकडे जात होती.
जखमींना जम्मू रुग्णालयात आणले
पोलिसांनी सांगितले की, गंभीर जखमींना जम्मूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर 12 जणांना स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कशी घडली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सध्या गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या बसवर प्रिन्स ट्रॅव्हल्स असे लिहिले होते.
दरम्यान या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या परिवारास दोन दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे. मृतांमधील सर्व जण लखीसराय अन् बेगूसराय जिल्ह्यातील आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच केंद्र सरकारला जखमींना योग्य ते उपचार मिळावे, यासाठी विनंती केली आहे.