मुंबई I झुंज न्यूज : राजापूर येथील भूमाफिया पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी दिल्यामुळेच आरोपी आंबेरकरने पत्रकार शशिकांत वारिशे याची गाडीखाली चिरडून हत्या केल्याचे एसआयटीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
७ फेब्रुवारी रोजी शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली होती. अगोदर हे प्रकरण साधा अपघात दाखवून दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र मराठी पत्रकार परिषद आणि रत्नागिरी येथील परिषदेच्या पदाधिकारयांनी त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती.
एसआयटीने चोकशी पूर्ण करून चार्जशीट दाखल केले. शशिकांत वारिशे सातत्याने आंबेरकर आणि रिफायनरीच्या विरोधात आणि बारसूच्या जनतेच्या बाजुने बातम्या देत असल्यामुळेच आंबेरकर याने शशिकांत वारिशे याची हत्या केल्याचे चार्जशीट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.