जिल्ह्यातील सावकारी पूर्ण पणे बंद करण्याचा मानस – अमित बगाडे
पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी बारामती लाईव्ह चे मुख्यसंपादक अमित लक्ष्मण बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमित बगाडे यांनी प्रत्येक शोषित, वंचीत, अन्यायग्रस्त व पिढीत शेतकरी, श्रमिक व महिलांना, तसेच सर्वसामान्य शेतकरी, कामगार अवैध सावकारांच्या जाचाला बळी पडून आत्महत्या करतात अश्या लोकांना पत्रकारितेच्या मध्यमातू न्याय मिळवून दिला आहे. या गोष्टींची दखल घेत महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष बालासाहेब भाबट खादगाव यांनी अमित बगाडे यांना “पुणे जिल्हाध्यक्ष” पदाची जबाबदारी दिली आहे.
पुणे जिल्हातील शेतकरी वर्गाला अवैध सावकारांना कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ कोणावर येऊन देणार नाही. पुणे जिल्ह्यातील सावकारी लवकरात लवकर पूर्ण पणे बंद करण्यासाठी निवेदन देणार असून वेळ प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. असा मानस अमित बगाडे यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला.