त्या भ्रष्ट वन परिक्षेत्र अधिकऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन – लखन चव्हाण
मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील वन परिक्षेत्रात क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. यानंतर सामाजिक कार्यकर्ते लखन चव्हाण यांनी मा.जिल्हाधिकारी, मुख्य वन संरक्षक, उप वन संरक्षक, यांना तक्रारी अर्ज दिला होता. मात्र गेल्या ४ महिन्यात अद्याप प्रशासन व वरिष्ठ अधिकारी यांनी कोणत्या ही प्रकारची दखल घेतली नाही.
मुळशी तालुक्यातील वन परिक्षेत्र मुगावडे आणि कोळावडे या गावातील वन जंगलात मृद व जल संधारनची कामे दगडी बंधारे (चेक डॅम ) ची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली होती. तसेच याठिकाणी दगडी बंधारे बांधण्याऐवजी त्याठिकाणी मातीचे बंधारे उभारले असून त्यावर फक्त दगडांचा मास चढविण्यात आला होता.
हि कामे चुकीच्या पद्धतीने का करत होते आणि यात भ्रष्टाचार झाला आहे का ? या सर्व गोष्टींची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा लखन चव्हाण यांनी ‘झुंज न्यूज’ शी बोलताना व्यक्त केली होती. तसेच वरिष्ठ अधिकार्यांना पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता. मात्र अद्याप या घटनेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या भ्रष्टचारातील भ्रष्ट वन परिक्षेत्र अधिकऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर मुळशी तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात येईल .असा इशारा आता सामाजिक कार्यकर्ते लखन चव्हाण यांनी दिला आहे.