सणसवाडी : सणसवाडीचे गांव कारभारी सोमनाथ फक्कडराव दरेकर यांच आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या मागे आकाश व सुरज अशी दोन मुले आहेत.
त्यांच्या पत्नी आशा सोमनाथ दरेकर यांनी सणसवाडीचे सरपंच म्हणून काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून दोनदा पंचायत समिती निवडणूक सुद्धा लढवली होती.
“सोमनाथ दरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांचा सणसवाडीच्या प्रत्येकाच्या सुखं दुःखात मोलाचा वाटा असत म्हणूनच त्यांना आदराने गावकारभारी असे प्रेमाने सर्व म्हणत. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.”