जुन्नर : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी पूणे येथे मूलींसाठी पहिलि शाळा सूरू केली ती वास्तू म्हणजे शहरातील भिडे वाडा हे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी महात्मा फुले ब्रिगेडचे दत्ता शिंदे यांनी तहसीलदार कोळेकर याना निवेदनाद्वारे केली असल्याचे सांगितले.
“महाराष्ट्र शासनाने ताबडतोब भिडे वाड्याची जागा भूसंपादित करून त्या ठिकाणी भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभे करावे. हा ऐतिहासिक ठेवा असून मुलींसाठी शिक्षणाची दारे खूली केल्यास अनर्थ होतील. असे काही उच्चभ्रूंचे मत होते. त्यासाठी सर्वांचा विरोध असतानाही १ जानेवारी १८४८ साली पहिली मुलींची शाळा सुरू केली.”
प्रसंगी काही समाजकंटकानी फूले दांपत्याला त्रास दिला अंगावर शेन चिखल फेकून मारले,नाना प्रकारे त्रास दिला परंतू महात्मा फुले डगमगले नाही तर जोमाने कार्य सूरू ठेवले ती ऐतिहासिक जागा शासनाने ताबडतोब संपादित करून स्मारक उभे करावे अशी मागणी निवदनाद्वारे केली आहे.
या वेळी दत्ता शिंदे, जुन्नर तालुका आध्यक्ष वसंत कापरे ,किरण वाघोले, शहराध्यक्ष संजय डोके, नारायण गावचे आध्यक्ष रामदास अभंग, कार्याध्यक्ष सूमंत मेहेर नितिन शेरकर, विक्रम नाईक, रूषी वाघोले आदी उपस्थित होते.