नागपूर : शंकर शेटे (वय ६३) या रूग्णाचा नागपूर महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधे उपचार सुरू असताना कोरोना मूळे मृत्यू झाला. त्यानंतर डाॅक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह प्लॅस्टिकच्या कपड्यात गुंडाळून नातेवाईकांना न दाखविताच पॅक करून दिला आणि गंगा बाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जायला सांगितले.
शंकरचे मेव्हणे मा नगरसेवक प्रेमलाल बांधकर यांनी नं एम एच ३१ एफ सी २९० या रूग्णवाहीकेमधून मृतदेह गंगाबाई घाटावर नेण्यात आला. त्या ठिकाणी नातेवाईकांनी शंकर शेटे यांच्या मृतदेहाचे अखेरचे दर्शन घेण्याचा हट्ट धरल्यामूळे मृतदेहचा चेहरा उघडला तर उपस्थित नातेवाईकांना शाॅकच बसला सिनेमातल्या सिन प्रमाणे मृतदेहावर जादू झाली आहे कि काय असा क्षणभर भास होऊ लागला. मृतदेहावर नावाचे लेबल शंकर शेटे लिहिले होते परंतू तो मृतदेह शंक शेटे यांचा नसून एका अनोळखी महिलेचा मृतदेह गुंडाळून दिला होता. त्यामूळे नातेवाईकांच्या संतापाचा पारा चढला.
या वेळी कोविड सेंटरमधे काम करनारा कर्मचारी दिपक लोनारी आणि चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. त्यांना मा नगरसेवक प्रेमलाल बांधकर यांनी दरडाऊन जाब विचारला तर कर्मचाऱ्यांनी हि आमची चूक नाही आम्ही सांग कामे कामगार आहोत. याला जबाबदार कोविड सेंटरचे डाॅक्टरांचा गलथानपना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामूळे नागपूर महानगरपालिकेचे पूरते धिंडवडे निघाले असले तरी शंकर शेटे यांचा मृतदेह गेला कूठे याचा शोध सूरू झाला आहे.